समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र
समरसता साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील साहित्यिक व सामाजिक चळवळींना जोडणारी संस्था असून, संत परंपरेतील समतेचा व समरसतेचा विचार साहित्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. संत शिरोमणी श्री रविदास महाराज यांच्या ६५० व्या प्रकटदिनानिमित्त, त्यांच्या भक्ती, समता आणि कर्मयोगाच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी ही राज्यस्तरीय लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
स्पर्धेचा उद्देश
संत शिरोमणी रविदास महाराजांचे विचार, त्यांची भक्ती-परंपरेतील भूमिका आणि सामाजिक समरसतेचा त्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत लेखनाच्या माध्यमातून पोहोचवणे.
व्याप्ती
महाराष्ट्रातील ८ विभागीय स्तरांवर तसेच बृहन्महाराष्ट्र (भारत व जगभरातील मराठी भाषक) या गटातून स्पर्धा घेतली जाईल. विभागीय विजेत्यांमधून प्रादेशिक (राज्य) स्तरावरील विजेते निवडले जातील.
परीक्षक
प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे
प्रा. डॉ. विजय राठोड
श्री. रवींद्र गोळे
डॉ. रमा गर्गे
डॉ. गजानन होडे
डॉ. विनीता तेलंग
प्रा. डॉ. उज्ज्वला हातांगळे-मोरे