नोंदणीपासून निकालापर्यंत
पोर्टलवर नोंदणी करताना ई-मेलवर OTP प्राप्त होईल. त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती भरून, विभाग व विषय निवडून लेखन सादर करायचे आहे.
नोंदणी + OTP पडताळणी
नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल क्रमांक, व्यवसाय, सामाजिक कार्यातील सहभाग व पूर्वीच्या लेखनाचा तपशील द्या.
विषय व विभाग निवड
५ विषयांपैकी एक विषय आणि स्वतःचा विभाग निवडा. लेखन मराठी मजकूर, PDF किंवा स्पष्ट फोटो (JPEG) स्वरूपात अपलोड करता येईल.
तज्ज्ञ परीक्षण
१ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून लेखन तपासले जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
लेखनासाठी विषय — यापैकी एकावर लिहा (शब्दमर्यादा: १८०० शब्द)
महत्त्वाचे नियम
स्वलिखित साहित्य
साहित्य स्वतः लिहिलेले असावे. संदर्भ वापरले असल्यास लेखनाच्या शेवटी संदर्भसूची द्यावी.
कॉपी / AI लेखन निषिद्ध
इतरांचे साहित्य जसेच्या तसे कॉपी करणे किंवा कृत्रिम प्रज्ञेकडून (AI) लेख लिहून घेणे मान्य नाही — असे आढळल्यास लेखन बाद केले जाईल.